पहूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । तब्बल दोन वर्षांनी शहरात श्रीसंत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने पहूर कसबे येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

संतांच्या वाणीतुन ब्रम्हरसाचा काढा घेऊन जगावर आलेल्या कोरोना संकटातुन सुटका व्हावी व त्यासाठी नामाच्या स्मरणानेच त्याचा नायनाट होईल व जगाची पीडा दुर होईल, अशी विनवणी श्रीसंत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्ताने पहूर कसबे येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

पहूर कसबे येथील विठ्ठल मंदिरात सदर सप्ताहात ह.भ.प.निवृत्ती महाराज, ह.भ.प.माधव महाराज, ह.भ.प.अमृत महाराज, यांचे किर्तन झाले असुन दि. 3 रोजी ह.भ.प. सदानंद महाराज, दि. 4 रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बोरसे, दि. 5 रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज, दि, 6 रोजी नरेंद्र महाराज यांचे हरिकीर्तन होणार असून शनिवार दिनांक 7 रोजी ह.भ.प.राजेंद्र महाराज (केकतनिंभोरा)यांचे काल्याचे किर्तन सकाळी नऊ ते अकरा यावेळात होनार असून नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविक भव्तांनी लाभ घेण्याचे आवाहन मंदिर ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content