शनीपेठ परिसरात जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड

जळगाव प्रतिनिधी । रिधूर वाड्यातील मराठी शाळेच्या बाजूला सुरू असलेल्या सट्टा व जुगार अड्ड्यावर शनीपेठ पोलीसांनी कारवाई केली असून दोन जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील शनीपेठ परिसरातील रिधूर शाळेच्या परिसरात सट्टा व जुगाराचा खेळ सुरू असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांना मिळाली त्यानुसार शनीपेठ पोलीसांनी आज सोमवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता छापा टाकून संशयित आरोपी मनोज रमेश शिनकर (वय-२९) रा. मारोती पेठ, जळगाव आणि भैय्या दत्तू सपकाळे (वय-३३) रा. कांचन नगर जळगाव यांच्यावर कारवाई करत त्यांच्याजवळील  २ हजार ७५० रूपयांची रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य हस्त केले. पोलीस नाईक किरण वानखेडे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, नंदकिशोर पाटील, पोहेकॉ इंदल जाधव, प्रशांत देशमुख, नरेंद्र बागुले, पोलीस नाईक अमोल विसपूते, किरण वानखेडे यांनी कारवाई केली.

 

Protected Content