गोडाऊनमधील हळदीच्या पोत्यांसह इतर सामान लंपास

रावेर, प्रतिनिधी ।  तालुक्यातील के-हाळे-कर्जोत रस्त्यावर असणाऱ्या एका गोडाऊन मधुन १ लाख ६३ हजार रूपयांचा हळदीसह इतर सामान चोरुन नेल्याची घटना उघड झाली आहे. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत वृत्त असे,  के-हाळे बु येथील शेतकरी विनय सतीष पाटील यांचे के-हाळे-कर्जोत रस्त्यावर शेतीचे सामान ठेवण्यासाठी गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये त्यांच्या शेतातून उत्पादन झालेली २२५ पोते हळद व रिओलिज कंपनीचे सिलबंद बंडल ठेवले होते. दि १ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्याने गोडाऊनचे कुलुप तोडून आत प्रवेश केला १ लाख ३५ हजार किमते २५ हळदीचे पोते रिओलिज कंपनीचे २१ हजार रुपये किमतीचे तिन सिलबंद ठिंबक नळ्याचे बंडल सात हजार रूपयांचा सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हिआर असा एकूण १ लाख ६३ हजार रुपयांचा सामान चोरट्यांनी लंपास केला आहे. विनल पाटील यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरुध्द रावेर पोलिस स्थानकात  चोरीचा गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस नाईक नीलेश चौधरी करीत आहेत.

 

Protected Content