पत्रकार अमोल गावंडे यांच्यावर दाखल गुन्ह्याची चौकशी करण्याची मागणी

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खामगाव येथील पत्रकार अमोल गावंडे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हया संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बुलढाणा जिल्हा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी १ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक बुलढाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

 

खामगांव येथील लोकमत डिजिटलचे जिल्हा प्रतिनिधी अमोल गावंडे यांच्यावर काही दिवसापुर्वी पारखेड फाट्यावर काही जणांनी भ्याड हल्ला करत मारहाण केली. त्यांचेकडील पैसे चोरुन नेले व गाडीचीही तोडफोड केली. या संदर्भात खामगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदर आरोपीविरुध्द गुन्हे दाखल करण्यांत आलेले आहे. मात्र आरोपींनी अमोल गावंडे यांच्या विरोधात खोटी अॅक्ट्रासिटीची तक्रार दिल्याने अमोल गावंडे यांच्यावर अॅक्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅक्ट्रासिटी सारखा गंभीर गुन्हा आहेत. दाखल करतांना उपविभागीय पोलीस अधिकारी हे चौकशी करुन गुन्हा दाखल करतात. मात्र अमोल गावंडे यांच्याविरुध्द तक्रारीची कोणतीच चौकशी न करता गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे.

 

बातम्या करतांना नेहमी आमच्या सारख्या पत्रकारांना व्यवस्थे विरुध्द लढावे लागते. त्यामुळे काही असामाजीक लोक व्यक्ती विरोधात जाऊन हल्ले करणे, मानसिक त्रास देणे, असे प्रकार राज्यात व जिल्ह्यात विविध घटनाक्रमातून समोर आलेले आहेत. तेव्हा यापुढे पत्रकारांच्या विरोधात त्याची निपःक्ष चौकशी करुनच कार्यवाही व्हावी व पत्रकार अमोल गावंडे यांच्या विरोधात दाखल झालेल्या अॅक्ट्रासिटी गुन्ह्याची निःपक्ष सखोल चौकशी करावी व योग्य तो न्याय दयावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर राहुल पहुरकर, संजय जाधव, कासिम शेख, संदीप शुक्ला, जितू कायस्थ, संदीप वानखेडे, वसिम शेख यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content