यावल येथे विद्यार्थ्यांसाठी जॉली फोनिक्स प्रशिक्षणाचे उद्घाटन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जॉली लर्निंग लिमिटेड (यु.के.), किड्स वर्ल्ड कन्सल्टंट मुंबई व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुक्यात जॉली फोनिक्स प्रशिक्षण येथील माध्यमिक कन्या शाळेत पार पडले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके व मुख्याध्यापिका नीलिमा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

 

कन्या शाळेत संपन्न झालेल्या या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरून आलेले तज्ञ मार्गदर्शक म्हणुन प्रामुख्याने उपस्थित होते. या मध्ये अनघा बहुलीकर (पुणे), हंसा जैन (जयपूर राजस्थान), निकिता कश्यप (पुणे) व कुमारी रुचिका चलाना (अहमदाबाद गुजरात), या सर्व तज्ञ मार्गदर्शकांनी या प्रशिक्षणास उपस्थित यावल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना उत्कृष्ट असे प्रशिक्षण दिले. सदरचे प्रशिक्षण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व इयत्ता पहिली ला शिकविणाऱ्या संपूर्ण शिक्षकांसाठी होते. हे जॉली फोनिक्स प्रशिक्षण त्याच्या नावाप्रमाणेच इंग्रजी विषया च्या फोनिक्स पद्धतीवर आधारित असून इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची गुणवत्ता व इंग्रजी विषयाचे योग्य प्रोनाऊनसेशनचे ज्ञान वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

 

किड्स वर्ल्ड कन्सल्टंट मुंबईच्या प्रमुख निती नगरकर यांनी प्रशिक्षणास भेट दिली व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे पाहून समाधानही व्यक्त केले. इयत्ता पहिली तसेच अन्य विद्यार्थ्यांनाही या पद्धतीचा लाभ करून देण्यासाठी आपापल्या शाळेत फोनिक्स पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या प्रगतीमध्ये सुधारणा नक्कीच होईल असे आश्वासन सर्व शिक्षकांनी दिले. या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणीक दृष्ठया अतिशय म्हत्वाच्या प्रशिक्षणास  संयुर्ण यशस्वी करण्यासाठी यावल तालुका गट शिक्षणाधिकारी विभ्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व गटसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Protected Content