यावल हद्दीत चोऱ्या वाढल्याने पोलीसांची गस्त वाढविण्याची मनसेची मागणी

यावल प्रतिनिधी । शहरातील विविध ठिकाणी मोठया प्रमाणावर चोऱ्यांच्या घटना घडत असुन या विषयावर पोलीस प्रशासनाने गांर्भीयाने विचार करावे आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस निरिक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही दिवसापासुन शहरामध्ये कोरोना विषाणु संसर्गा सारखेच चोऱ्यांच्या घटनामध्ये झपाट्याने वाढ होत असुन, रात्रीच्या वेळीस चोरांचे मुक्त संचार होतांना दिसत असल्याचे दिसुन येत असुन शहरातील रात्रीच्या वेळेस पोलीसांची गस्त नसल्याने संशयीत व्यक्ति बिनधास्तपणे फिरतांना दिसत असुन अशा प्रकारे फिरवाऱ्या अनओळखी व्याक्ती कडुन सामान्य नागरीकांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनाच्या वतीने रात्रीची गस्त नियमित करून या सर्व विषयावर चपराक बसावी आणी शहरातील वातावरण हे अनुकुल रहावे, अशी मागणीचे निवेदन पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांना दिले असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यावल शहराध्यक्ष चेतन दिलीप अढळकर, तालुका सचिव संजय नन्नवरे, यावल तालुका मनसे रस्ते साधन आस्थापनाचे तालुकाध्यक्ष बळीराम पाटील, विरेन्द्रसिंग राजपुत, आबीद कच्छी, गौरव कोळी, अजय तायडे, निलेश खैरनार आदी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहे. शहरातील विस्तारीत वसाहती मधील क्षेत्रात चोऱ्यांच्या घटना मागील काही दिवसापासुन घडत असुन , पोलीस स्टेशन मध्ये चोरीच्या घटनांची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली जाते आणी तक्रार घेतली तर पोलीस प्रशासनाच्या उदासिनतेमुळे योगरित्या तपास करून गुन्ह्यांचा उलगडा होत नाही अशी शहरातीत नागरीकांची ओरड असल्याचे वृत्त आहे .

Protected Content