पोलिसांच्या मोफत आरोग्य तपासणी उपक्रमास उत्सफुर्त प्रतिसाद 

 

भुसावळ, प्रतिनिधी ।  येथील श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल  येथे भुसावळ व परिसरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी  आयोजित करण्यात आली आहे . त्यास उत्सफुर्त प्रतिसाद लाभला असून शनिवार रोजी पोलिस अधिकारी व नगर परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यानि आरोग्य तपासणी केली.

लॉकडाउन काळापासून कोरोनाच्या संकट समयी पोलिस प्रशासन अविरतपणे कर्तव्यपूर्ती करत आहे. त्यांच्या सेवेत त्यांनी आरोग्याविषयी जोखीम पत्कारली. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी श्री  रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने मोफत आरोग्य तपासणी उपक्रम राबविला.

सकाळी ११ ते ५ यावेळेत तीन दिवस हि आरोग्य तपासणी होत असून शनिवाररोजी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्याहस्ते या उपक्रमाचे उध्दघाटन झाले.  यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठोंबे , तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि . रामकृष्ण कुंभार , रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन पाटील, डॉ. लक्ष्मीकांत नागला, डॉ. कुशल पाटील व श्री कल्याणी चेरिटेबल चे संचालक गौतम चोरडिया व सुराणा म गृपचे संमकित सुराणा  उपस्थित होते.

याउपक्रमात प्राथमिक तपासणीसह इसिजी, रक्तदाब ,रक्तातील साखर , नेत्र तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला देखील देण्यात आला.

उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व तालुका आणि शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकाऱ्यानिसुध्दा आपली आरोग्य तपासणी केली. भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार आदीनि आरोग्य तपासणी करून घेतली. या उपक्रमात बाजारपेठ पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे ,  तालुका पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यारि आरोग्य तपासणी करून घेत आहेत.

Protected Content