राष्ट्रवादीत उभी फूट की शरद पवारांचीच खेळी ?

pawar pawar

मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली की, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचीच ही खेळी आहे का ? हे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

आज सकाळी आकस्मिकपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा कोणताही मोठा नेता उपस्थित नव्हता. यामुळे अजित पवार यांनी कुणालाही सुगावा लागू न देता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तर शपथविधी होऊन गेल्यानंतर शरद पवार अथवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती तेव्हाच राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले होते. तथापि, महाविकास आघाडीच्या उभारणीतदेखील ते सक्रीय झाल्याने ही चर्चा मागे पडली होती. मात्र सकाळी सव्वाआठच्या सुमारास उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चर्चांना कंटाळून आपण भाजपला पाठींबा दिल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. तथापि, याबाबत राष्ट्रवादीतर्फे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

कोणताही सुगावा लागू न देता भाजपने आज सकाळी सरकार स्थापन केल्यानंतर खळबळ उडणे स्वाभाविक आहे. यातच अजित पवार यांनी आपल्यासह गट फोडून ही खेळी केली, संपूर्ण राष्ट्रवादीच भाजपच्या सोबत गेली की, अजितदादांना शरद पवार यांनीच पाठविले ? हे प्रश्‍न आता उपस्थित झाले आहेत.

Protected Content