… तोच खरा लोकप्रतिनिधी – आ. चिमणराव पाटील

एरंडोल प्रतिनिधी । सरकार रूपी महासागरात डुबकी मारून जो हीरे-मोती काढुन आणतो तोच खरा लोकप्रतीनिधी असतो असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,सामाजिक कार्यकर्ते चिंतामण पाटील,युवासेना प्रमुख बबलु पाटील,शरद ठाकुर,कुणाल पाटील,राज पाटील,मुकुंदा पाटील,कृष्णा ओतारी,तेली समाजाचे पदाधिकारी आनंदा चौधरी आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना आमदार पाटील म्हणाले संस्था लोकांच्या विकासासाठी स्थापन झालेल्या असतात त्या माध्यमांतुन जर चांगली कामे होत नसतील तर त्या काही कामाच्या नाहीत.

एरंडोल शहराच्या हद्दवाढीचे काम आम्ही मार्गी लावले, वाढीव क्षेञासाठी मंजूर निधी पैकी अजूनही विस कोटी निधी पडून आहे. तसेच नगर पालिकेत आमची सत्ता नसताना चार कोटीची कामे दिली,आगामी न.पा.निवडणुकांमध्ये जर आम्हाला मतदारांनी सत्ता सोपवली तर तीनशे कोटींपेक्षा अधिक निधी आम्ही एरंडोल-पारोळा शहरांच्या विकासासाठी आणू अशी ग्वाही आ.चिमणराव पाटील यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी  पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रा.सुधीर शिरसाठ, शहराध्यक्ष कैलास महाजन, राजु ठक्कर, कुंदन ठाकुर, आबा महाजन, उमेश महाजन, पंकज महाजन, शैलेश चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी यांनी केले.सूत्रसंचलन दिनेश चव्हाण आभार कुंदन ठाकुर यांनी मानले.

 

Protected Content