दोषींवर कारवाई होणार : एकनाथ शिंदे

विरार । येथील विजय वल्लभ कोविड केअर सेंटरमधील आयसीयू विभागाला लागलेल्या आगीत १३ रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

आज पहाटे विरार येथील वल्लभ कोविड केअर सेंटरमधील एसीच्या काँप्रेसरमध्ये स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली. यात १३ रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. अग्नीशामन दलाच्या बंबांनी आज आटोक्यात आणली आहे. मात्र या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी वल्लभ कोविड केअर सेंटरला भेट दिली. याप्रसंगी त्यांना मृत रूग्णांच्या नातेवाईकांचा संताप सहन करावा लागला. या आप्तांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना मंत्री शिंदे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबतची माहिती जाणून घेतली असून ते यावर लक्ष ठेवून आहेत. ही आग मानवी चुकीमुळे लागल्याचे दिसत असून यातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Protected Content