“त्या” पोलिसांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील अवैध धंदे व वाढती गुन्हेगारी रोखण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या पोलीस निरीक्षकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, अन्यथा येत्या आठवडे भरात मोठे आंदोलन करण्यात येईल. अशा इशारा शिवसेनेतर्फे निवेदनावेळी पोलिस प्रशासनास देण्यात आला आहे.

निवेदन वजा इशारा देण्यात येते की, मुक्ताईनगर तालुका हा महाराष्ट्र राज्य व मध्यप्रदेश च्या सीमारेषेवर असल्याने या भागात परप्रांतीय अवैध धंदे व या माध्यमातून या तालुक्यात गुन्हेगारी वाढत असून भरीसभर आजूबाजूच्या तालुक्यातील रेल्वे जंक्शन परिसरात असलेली गुन्हेगारी येथे पाळेमुळे घट्ट करीत असल्याचे दिसून येत आहे. मुळात हा तालुका आदिशक्ती संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या काही काळापासून पोलिसांच्या दुर्लक्षामुळे किंवा आर्थिक हितसंबंधामुळे संत भूमीत गुन्हेगारी वाढतांना दिसून येत असून मध्यल्या काळात येथे गावठी कट्टे , हत्यारांची तस्करी, शहरातील भर चौकात तीक्ष्ण हत्यारांचे वार, अवैध

बंदुकीच्या माध्यमातून दहशत माजविण्याचे प्रकार, इतर तालुका व जिल्ह्यातील तडीपार, मोक्का लावलेल्या गुन्हेगारांचा मुक्त संचार मागील काळात एका गुन्हेगारा कडे तर चक्क गावठी कट्टा आढळून आल्यावर हि त्याचे प्रकरण सोयीस्कर रित्या दाबून ठेवले असल्याने गुन्हेगारी वाढत असून त्याचेच उदा.म्हणजे मागील काळात दि.६/११/२०२१ रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे जबरी दरोडा टाकून एका व्यक्तीचा खून करण्यात आला.त्याच दिवशी रात्री याच तालुक्यातील कोथळी या गावात श्री.विनोद शिंदे यांचे घरावर मोठा दरोडा टाकल्याची घटना घडली. या घटना ताज्या असतांनाच दि.१०/११/२०२१ रोजी कु-हा ता.मुक्ताईनगर येथे श्री.दिनेश जयस्वाल यांचे घरावर सुध्दा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. त्यातच

मागील काळात शहरामध्ये पिस्तोल घेऊन फिरणारे गुंडांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रीय महामहामार्गावर बाहेरील गुन्हेगारी स्वरूपाचे लोकांची सरेआम खंडणीचे प्रकार वाढलेले आहेत. तसेच काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून झिरो पोलीस च्या माध्यमातून वाहन धारकांची लूट असे प्रकार वाढलेले आहेत. तसेच जुगाराचे अड्डे उघड उघड सुरु आहेत. भरीसभर लोकमत पेपर ला पुरनाड फाट्यावर जुगाराच्या क्लब ची नोंदणी कृत च्या नावाखाली जाहिरात येणे व अवैध धंद्यांची उघड उघड ऑफर देणे हे प्रकार अर्थपूर्ण व्यवहारातून वाढलेले आहेत.तिर्थक्षेत्र असलेल्या आदिशक्ती मुक्ताईच्या भूमीत असल्या प्रकाराला आळा घालणे आवश्यक असतांना येथील पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत.

मुक्ताईनगर पो.स्टे.चे कार्यरत पोलीस निरीक्षक गुन्हेगारी थांबविण्यात सपशेल अपयशी ठरताना दिसून येत असून उलट गुन्हेगारी वाढत असून अवैध धंदे जोरात सुरु होत आहे. गेल्या महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर शहरात दि.८ जानेवारी २०२२ रोजी अवैध बनावट इंग्लिश दारू विक्रेत्यावर कारवाई केली.तसेच याच तालुक्यातील कुहा येथील अवैध बनावट इंग्लिश व भावी दारूचा कारखाना सुध्दा दि.११ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री जळगाव एलसीबी ने कारवाई करून उध्वस्त केला होता. एक प्रकारे स्थानिक पोलीस अर्थपूर्ण डोळेझाक करत असतांना बाहेरून येणारे इतर एजन्सी कारवाई करतात. हे निरीक्षकाचे सर्वात मोठे अपयश असून मुक्ताईनगर पोलीस निरीक्षकांवर कार्यवाही का नाही.? मुळात हि संतांची भूमी असल्याने येथे दारूचा व अवैध दारूचा लवलेशहि नसावा. यासंदर्भात तालुक्यातील अनेक महिलांनी दारू बंदी साठी अनेक वेळा निवेदने व तक्रारी देऊन व आंदोलने करून देखील कारवाई तर होत नाही, उलट थातूर मातुर कारवाईचा दिखावा करून पुन्हा वाढीव अर्थपूर्ण संबंधातून बनावट इंग्लिश दारूचे, अवैध दारूचे धंदे सर्रासपणे सुरु आहेत. त्यामुळे वारंवार तक्रारी करून निवेदने देवूनही ह्या पोलीस निरीक्षकांकडून आजपावेतो अशी कुठलीच धाडसी कारवाई होतांना दिसून येत नसल्याने या अवैध धंदे व अवैध बनावट दारू विक्रेत्यांशी यांचेही अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा आहे.

तरी सदरील मुक्ताईनगर पो.स्टे.ला कार्यरत व सद्या जळगाव नियंत्रण कक्षात जमा झालेले पोलीस निरीक्षक राहुल खताळ वाढती गुन्हेगारी थांबविण्यास सपशेल अपयशी ठरलेले आहे. वारंवार बाहेरची एजन्सी येवून कारवाई करतात. यावरून त्यांचे हे अपयश असल्याने त्यांच्यावर बदली पुरता कार्यवाही न करता त्यांची सखोल चौकशी करून त्यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेनेतर्फे येत्या आठवडे भरात मोठे आंदोलन करण्यात येईल.याची नोंद घ्यावी होणाऱ्या परिणामास आपले प्रशासन जबाबदार असेल.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content