केसीईत बेंडाळे शिष्यवृत्ती वाटप

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । केसीई मध्ये दरवर्षीप्रमाणे केसीई सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. जी. डी. बेंडाळे यांच्या सहचारिणी शालिनीताई बेंडाळे यांनी दिलेल्या देणगीतून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. त्याप्रमाणे गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालय तसेच ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्तीचे वाटप नुकतेच करण्यात आले.

आर्थिक दृष्ट्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीचे वितरण केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर तसेच शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांच्या हस्ते  करण्यात आली. प्रत्येक इयत्तेतील पाच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन मुख्या. रेखा पाटील तसेच मुख्या. प्रणिता झांबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी यांनी केले आणि आभार प्रदर्शन योगेश भालेराव यांनी मानले . कार्यक्रमासाठी  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर प्रसंगी पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!