आ. दराडे यांच्या निधीतून पुस्तक वाटप

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – नाशिक शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आ. किशोर दराडे यांच्या आमदार निधीद्वारे गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक संचाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिक शिक्षक मतदार संघातील आमदार किशोर दराडे यांच्या आमदार निधींअंतर्गत होतकरू, गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय ग्रंथालयास अभ्यासक्रमाची पुस्तके भेट देण्यात आली. यात रावेर तालुक्यातील ३५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे.

रावेर येथील सौ. कमलाबाई.एस.अग्रवाल गर्ल्स हायस्कूल्मध्ये शिक्षक आमदार निधीतून या पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष जे.के.पाटील, संस्थेचे चेअरमन प्रा.प्रकाश मुजुमदार, माजी उपप्राचार्य डी.एस.चौधरी, संभाजी पाटील, कन्हैया अग्रवाल, गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिका कानडे, ललित चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहम्मद आदी पदाधिकारी, तालुक्यातील पुस्तकप्राप्त शाळांचे मुख्याध्यापक, ग्रंथपाल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. जळगाव पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, चेअरमन प्रकाश मुजुमदार सर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शैलेश रमेश राणे यांनी तर आभार पुष्कराज मिसर यांनी मानले.

Protected Content