Home धर्म-समाज यावलमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष ; पारंपरिक वेशभूषेत हजारो आदिवासी बांधवांची भव्य...

यावलमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष ; पारंपरिक वेशभूषेत हजारो आदिवासी बांधवांची भव्य मिरवणूक

0
70


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल शहरात उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे संपूर्ण शहर आदिवासी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाले.

जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर यावल शहरात विविध भागांतून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले. पारंपरिक पोशाख परिधान करून महिला, पुरुष तसेच युवक-युवती मिरवणुकीत सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य सादर करत आदिवासी बांधवांनी आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविले. मिरवणुकीदरम्यान आदिवासी समाजाच्या पारंपरिक रूढी-परंपरा, कला आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. विविध पारंपरिक वेशभूषांमुळे आणि उत्स्फूर्त नृत्यामुळे मिरवणुकीला विशेष आकर्षण प्राप्त झाले. शहरातील प्रमुख मार्गांवर नागरिकांनीही मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी यावलच्या नगराध्यक्ष सौ. छाया पाटील, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील आणि परसाडेच्या सरपंच मीना तडवी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा तसेच इतर थोर आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आदिवासी दिनाच्या निमित्ताने समाजातील एकता, संस्कृती आणि पारंपरिक वारसा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. आदिवासी समाजाच्या हक्कांसह त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचे संवर्धन करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले. यावल शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त निघालेल्या या भव्य मिरवणुकीमुळे आदिवासी समाजातील एकजूट आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडले. पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि उत्साहामुळे दिवसभर शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.

यावल एसटी आगारातील वाहक चालक आणि पदधिकारी यांच्यामार्फत नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी रॅलीमध्ये यावल रावेर चोपडा या ठीकाणाच्या हजारो आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. या रॅलीत तालुक्यातील खेड्यांवरची तडवी भिल समाज आदिवासी सर्व मोठया संख्येत उपस्थित होते. यावेळी आदिवासी समाजाची सेवेसाठी यावल एसटी आगार कर्मचाऱ्यांनी नाष्ट्यासाठी दोन क्विंटल पोह्यांच्या नाष्टा आणि वीस कॅरेट केळी वाटप करण्यात आली. याप्रसंगी कर्मचारी अमित तडवी, जहाबीर तडवी,अशरफ तडवी, हमीद तडवी, शकूर तडवी, बी. के. तडवी, रफिक तडवी, यावल एसटी आगारातील तडवी भिल समाजाचे कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound