कैकाडी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत डिजीटल शैक्षणिक साहित्य पुरविण्याची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कैकाडी-भटक्या विमुक्त जाती जमातीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट आणि विज बिल उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडीच्या वतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील कैकाडी भटक्या विमुक्त जाती जमाती हा समाज अत्यंत गरीब व वाड्यावर राहणारा असून हलाखीचे जीवन जगत आहे. अशाच परिस्थितीमध्ये कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. परंतु या समाजातील विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल अथवा वीज असे कुठलेही साधन उपलब्ध नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने कैकाडी समाजासाठी लाईट व्यवस्था करून शिक्षणासाठी मोबाईल व लॅपटॉपची व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेता येईल. शिक्षणासाठी डिजिटल साहित्य उपलब्ध करून दिल्यामुळे कैकाडी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल अशी मागणी निवेदनात केली आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डी.बी.जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रतिभा गायकवाड, सचिव संदीप जाधव, यश गायकवाड, मालती जाधव, किशोर जाधव आदी उपस्थित होते.

 

Protected Content