महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन: नेत्यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका

उबाठाचे करण पवार तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांना भरला उमेदवारी अर्ज

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बुधवारी २४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पवार यांनी उबाठा गटातर्फे तर रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला आहे.

उमेदवारी दाखल करण्यापुर्वी महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर, ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने काढलेल्या रॅलीत हजारो स्त्री-पुरूष सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून रॅलीला सुरूवात करण्यात आली. महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने गर्दी पहायला मिळाली.

Protected Content