घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील पटेलवाडा परिसरात राहणारे पटेल कुटुंबीयांच्या यांच्या घराला अचानक आगल्याने लागल्याने जिवनावश्यक वस्तुंसह सुमारे १ लाख २५ हजार रुपयाचे अंदाजे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा शासकीय पंचनामा करण्यात आला असुन आगग्रस्त कुटुंबास आथिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

यावल तालुक्यातील दहिगाव गावात राहणारे मनोहर मासुम पटेल यांच्या घरास मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आग लागलेली आग गावकऱ्यांच्या सहकार्याने विझविण्यात आली. आगीची माहिती मिळताच तलाठी हेमंत मारोडे यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला. आगीत चांदीचे दागिने, घरावरील पत्रे, ज्वारी गहू, तांदूळ, दाळ, कपडे फ्रीज, कुलर, पलंग, गादी, पंखा आदी संसारोपयोगी वस्तून जळून खाक झाले आहे. या आगीत सुमारे १ लाख १५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे.

पटेल यांच्या बंद घराला आग कशी लागली हा विषय संपुर्ण गावात चर्चेला जात आहे. घरमालकास मात्र घराच्या मागील दरवाजा बिजागरे तुटलेल्या अवस्थेत दिसून आलेत त्यामुळे हा कोणीतरी प्रकार केला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कपाटात नवे कपडे चांदीचे दाग दागिने पंखा पूर्ण जळून खाक झालेत घरातून धूर निघायला लागल्याने आजूबाजूच्या गावकऱ्यांनी धाव घेतली आणि आग त्वरित विझवण्यास मदत केली. अन्यथा अनुचित प्रकार घडला असता घटनास्थळी गावाचे प्रथम नागरिक सरपंच अजय अडकमोल, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी यांचे लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या पटेल कुटुंब ही घराला लागलेल्या आगमुळे आर्थिक संकटात आले आहे. नुकसानग्रस्त कुटूंबास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

Protected Content