बंद घराच्या खिडकीतून बॅगेतील सोन्याचे दागिने व रोकड लांबविले

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील व्यापाराचे घर बंद असताना उघड्या खिडकीतून दागिने व रोकड ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून येण्याचे समोर आले आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कमलेश जयकुमार जैन रा. सरदार वल्लभभाई पटेल नगर, मुक्ताईनगर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. १९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता सर्व कुटुंबीय झोपलेले असताना मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या उघड्या खिडकीतून काहीतरी वस्तूच्या सहाय्याने खिडकीला लागून असलेली बॅग काढून बागेतील ५ हजार रुपयांची रोकड व ६० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याचे समोर आले आहे. या संदर्भात कमलेश जैन यांनी तातडीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोहेकॉ महंमद तडवी करीत आहे.

Protected Content