यावल ते कोरपावली रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । येथील कोरपावली हा रस्त्या गेल्या १५ वर्षापासुन डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत असुन, लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे लक्ष दिल्यास या मार्गावरील रस्त्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा कोरपावली परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

यावल ते विरावली मार्ग कोरपावली गावाचा प्रवास हा सुमारे ९ ते १० किलोमिटर अंतराचे आहे तर कोरपावली ते यावल हा अगदी पाच किलोमिटरचा मधला मार्गावरील रस्ता मोजक्या १० मिनिटात यावल शहरात पहोचवणारा मार्ग आहे. हा रस्ता गेल्या १० ते १५ वर्षापासून हा पंचक्रोशीतीत नागरिक व शेतकरी बांधवांच्या दळणवळणाचे साधन असलेल्या मार्ग मात्र अद्याप लोकप्रतिनिधीच्या दृष्टीपथात आलेल्या नाही हे कोरपावलीकर ग्रामस्थांचे व शेतमजुर व शेतकऱ्यांचे दृदैव म्हणावे लागेल की काय असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे . 

यावल ते कोरपावली या गावाला पहोचवणारा हा रस्ता गेल्या १५ वर्षापासुन डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. माजी खासदार कै . हरिभाऊ जावळे यांनी १५ वर्षापुर्वी खासदार निधीतुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले होते. आता हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन जिल्हा परिषद कडे वर्ग करण्यात आले. या रस्त्याच्या एक किलोमिटर डांबरीकरणासाठी जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रविन्द्र (छोटु) पाटील यांच्या प्रयत्नातुन मंजुर करण्यात आले.  या रस्त्याचे संपुर्ण डांबरीकरण व्हावे व हा रस्ता पुन्हा जिल्हा परिषदकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी ही होत आहे . कोरपावली गावातील शेतकरी व नागरीकांनी गेल्या अनेक वर्षापासुन लोकप्रतिनिधी , पंचायत समिती आदी ठीकाणी निवेदने देवुन पाठपुरावा करीत असुन या प्रश्नाकडे लक्ष देणे शेतकऱ्यांचे व शेतमजुरांच्या हिताचे आहे .

Protected Content