हिंगोणा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे सुमारे २० वर्षापुर्वीच्या बांधलेल्या महीला शौचालय परिसर व गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, या घाणीच्या गोंधळामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकाराने महीला वर्गात ग्रामपंचायतविरोधात तिव्र नाराजी पसरली आहे.

संपुर्ण महाराष्ट्र राज्यात आर्थिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीकोणातुन सदन ग्रामपंचायत म्हणुन हिंगोणा तालुका यावल ही ओळखली जाते. मात्र, मागील काही वर्षापासुन गावाचा विकास हरवल्याचे चित्र दिसत आहे. १३ व्या व१४ व्या वित्त आयोगच्या निधी पूर्णपणे पाण्यात गेला असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. निधी उपलब्ध असतांना गावाचा विकास स्वार्थापोटी आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी केला नसल्याचेही ग्रामस्थ बोलत आहेत. १५ व्या वित्त आयोगाचा लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आहे. मात्र, ग्रामपंचायत गावातील महिलांच्या शौचालयांची जिर्ण अवस्था व पुरुष शौचालयाची दुर्लक्ष करत आहेत. यातूनच महीलांना उघडयावर शौचास बसावे लागत आहे. गावात विविध ठिकाणी मुताऱ्या देखील नाहीत. या गंभीर नागरी समस्याबाबत ग्रामपंचायतीकडे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. गावाच्या मध्यभागी पाय विहीर असल्याने विहीर उघडयावर असल्याने या विहीरीत आज पर्यंत १५ ते २० जणांनी विहीर उडी घेवुन आत्महत्या केली आहे. या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यासाठी किंवा त्या धोकादायक विहीरींवर जाळी बसवण्यासाठी हिंगोणा ग्रामपंचायतीकडे वेळ नसल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. आजपर्यंत हिंगोणा ग्रामपंचायतीवर सरपंच व सदस्य यांनी गावाचा विकास न करता स्वतःचा विकास करून घेतल्याची संतप्त भावना गावंकऱ्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. हिंगोणा गावाच्या सर्व नागरी समस्याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी , यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी गावाकडे लक्ष देवुन १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन किमान ग्रामस्थांच्या विविध समस्या सोडविव्यात व हिंगोणा गावाच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Protected Content