पारोळा येथे घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

पारोळा प्रतिनिधी । शहरातील भगवान नगर परिसरात राहणाऱ्या एका घरात अज्ञात चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केल्याचे 15 एप्रिल रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, राहुल राजेंद्र पाटील (वय-35 रा. भगवान नगर पारोळा ) हे खाजगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १४ एप्रिल ते १९ एप्रिल दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ते काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरातील ८ हजार रुपयांची रोकड तर ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याच्या बांगड्या आणि ८ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही असा एकूण ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content