स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील स्वामी विवेकानंद (मु. जे.) कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी भाषेविषयी अनेक विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडण्यासह उपप्राचार्य के.जी.सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अथिती उपप्राचार्य के. जी. सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, हिंदी भाषेचं महत्त्व आणि ओळख पटवून देण्यासाठी तसेच हिंदी भाषेचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आज म्हणजेच १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात ४२० मिलियन लोक हिंदी भाषा बोलतात. १४ सप्टेंबर हा दिवस महान साहित्यिक व्यौहार राजेंद्र सिंह यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी हिंदी भाषेचं महत्त्व पटवून देण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. यामुळे त्यांचा जन्मदिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो, तसेच हिंदी भाषेतील रोजगाराच्या संधी सांगत राष्ट्रभाषेतील गोडवा व माधुर्याचे विविध दाखले दिले. त्यानंतर हिंदी भाषेचे अस्तित्व व महत्व याबद्दल विध्यार्थ्यानी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाप्रसंगी पर्यवेक्षक आर. बी. ठाकरे, समन्वयक प्रा. स्वाती बऱ्हाटे, प्रा. प्रसाद देसाई, प्रा. उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यार्थिनी पूजा शिगोटे हिने तर आभार विद्यार्थिनी वैष्णवी पाटील हिने मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content