मुंबई प्रतिनिधी । आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाला दिल्ली हायकोर्टाने शनिवारी बंदी घातली आहे. ‘चंदा: ए सिग्नेचर दॅट रुन ए करीयर’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
सध्या सीबीआय व ईडी चंदा कोचर यांची चौकशी करत आहेत, असं या चित्रपटाच दाखवण्यात आलं होत. त्यामुळे चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. याविषयी चंदा यांचे वकिल विजय अग्रवाल यांनी सांगितले की, 20 नोव्हेंबर 2019 रोजी चंदा कोचर यांना हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित असल्याचे समजले. या चित्रपटाच्या नावातही चंदा यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु, या चित्रपटासाठी चंदा कोचर यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्रीनेही प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना चंदा कोचर यांच्या आयुष्यावर बायोपिक करत असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटात अभिनेत्री गुरलीन चोप्रा हिने चंदा कोचर यांची भूमिका साकारली आहे. या सर्व बाबींमुळे चंदा यांच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयाच युक्तीवाद केला आहे. त्यामुळे न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली आहे.