भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीत लाखो रूपयांच्या भ्रष्टाचाराबाबत राष्ट्रीय दलीत पँथरच्या वतीने दोन वेळा धरणे आंदोलन आणि उपोषण करण्यात आले होते. आश्वासनानंतर आंदोलन व उपोषण मागे घेण्यात आले. दोन महिने होवूनही अद्यापपर्यंत चौकशी झाली. भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास नाशिक येथील आयुक्त कार्यालयासमोर बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथील ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि रोजगारसेवक यांनी संगनमताने लाखो रूपयांची भ्रष्टाचार केला असून भ्रष्टाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे आणि राष्ट्रीय दलित पँथरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात आले होते.
उपोषणस्थळी पहिल्यांदा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः उपोषण सोडून लेखी आश्वासन देऊन १५ दिवसाच्या आत तक्रारदाराला सोबत घेऊन झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे नोंद केले जातील अशा प्रकारचे लेखी आश्वासन दिले होत. दुसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे व राष्ट्रीय दलित पॅंथर यांनी आमरण उपोषणाला बसले असता त्यावेळी उपोषण मागे घ्या व तुमच्या तक्रारीच्या व तक्रारदाराला सोबत घेऊन संपूर्ण चौकशी करू व जिल्हास्तरीय तीन अधिकाऱ्यांची समिती नेमन्यता आली होती व चौकशी करण्याचे लेखी आश्वासन उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. परंतू आजपर्यंत उपोषण व आताचे उपोषण असे दीड महिना उलटूनही कोणतीही चौकशी करण्यात आलेले नाही. काहीतरी यात गौडबंगाल आहे की, काही पाणी कुठेतरी मुरते आहे की काय ! असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी इतके दिवस उलटूनही चौकशी होत नसल्याने संबंधित भ्रष्टाचारी यांना अधिकारी का पाठीशी घालत आहे..? का तक्रारदारांना आजपर्यंत हजर राहण्याचा आदेश देत नाही, म्हणजे यात नेमका काय प्रकार आहे. हे कळेनासे झाले आहे व सबंधित भ्रष्टाचार्यांना दप्तरात व इतर दस्तावेज यात फेरफार करायला अधिकारी वेळ तर देत नाहीये ना..? असा प्रश्न पण उपस्थित होत आहे.
लाखो रूपयांची भ्रष्टाचाराची चौकशी या आठवड्यात १७ सप्टेंबर तारखेच्या आत न केल्यास नाशिक येथे आयुक्त यांच्या कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) यांना ग्रामपंचायत सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस प्रेमचंद सुरवाडे, राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हा सचिव सुभाष जोहरे, तालुका उपाध्यक्ष शरद सुरवाडे यांनी दिले आहे.