भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांचा भुसावळात सत्कार

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । भाजपचे नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांचा आज भुसावळ येथे सत्कार करण्यात आला.

store advt

भारतीय जनता पार्टीचे अलीकडेच नियुक्त करण्यात आलेले जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी आज भुसावळ येथील आ. संजय सावकारे यांच्या स्थानिक संपर्क कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भुसावळच्या भाजप पदाधिकार्‍यांनी त्यांचा हृद्य सत्कार केला.

या वेळी आमदार सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रा. डॉ.सुनिल नेवे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, सरचिटणीस अमोल महाजन, पवन बुंदेले, नगरसेवक अमोल इंगळे.निक्की बत्रा, गिरीश महाजन. परिक्षित बर्‍हाटे, अनिरुद्ध कुलकर्णी, पुरुषोत्तम नारखेडे, अजय नागराणी, प्रशांत नरवाडे, रमाशंकर दुबे आदी उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!