जिल्ह्यात आज २८५ नवीन कोरोना पॉझिटीव्ह तर २८४ झालेत बरे !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज २८५ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून आजच २८४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णांची माहिती एका प्रेस नोटच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात आज २८५ नवीन बाधीत आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ७५ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल जामनेर-३५ व चाळीसगाव-२७ रूग्ण आढळले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-१८; भुसावळ-१२; अमळनेर-१६; चोपडा-२०; पाचोरा-२३; भडगाव-११; धरणगाव-२५; यावल-१; रावेर-९; पारोळा-६; मुक्ताईनर-६ आणि दुसर्‍या जिल्ह्यातील १ असे रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ११,३८८ इतकी झाली आहे. आजवर ७८४१ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून एकूण ३०२० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज जिल्ह्यात कोरोनामुळे ९ रूग्णांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. यामुळे आजवर मृत रूग्णांची संख्या ५२७ इतकी झाल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने कळविले आहे.

 

corona news jalgaon, jalgaon corona news, jalgaon, bhusawal, bhusawal corona news, chalisgaon, chalisgaon corona news, amalner, amalner corona news

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.