कर्कश आवाज काढणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी (व्हिडीओ)

वरणगाव दत्तात्रय गुरव ।  वरणगाव शहरात सर्वत्र बुलेट क्रेझ वाढले आहे. त्यात चित्रविचित्र आवाज करणारे सायलेन्सर लावून शहरात कर्कश आवाज करून नागरीकांना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर आज वरणगाव शहर पोलीसांनी अश्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रहिवाशी महेश सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्कश आवाजाने सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘बुलेट’ ची सध्या वरणगाव मध्ये क्रेझ वाढत आहे. सद्या रस्त्यावर बुलेट वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात दिसू लागली आहे. मात्र, या बुलेट वाहनांच्या सायलेन्सरमध्ये वाहन धारकांनी बदल करून मध्येच  फटाका फुटण्याचा किंवा एखाद्या बंदूकि मधुन गोळी सुटण्या सारखा  मोठा कर्कश असा आवाज काढण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, हा आवाज ध्वनिप्रदूषणा बरोबरच गर्दीच्या ठिकाणी अपघाताचे कारण ठरू शकतो. त्यामुळे असा विचीत्र आवाज वाजविणाऱ्या बुलेट चालकांवर वरणगाव पोलिस स्टेशनचे वाहतूक शाखेकडून कारवाई करावी अशी मागणी महेश सोनवणेंसह विशाल सोनार, नरेंद्र लोधी, डॉ. अनिल पाटिल, पंकज पाटिल, सुभाष पोतदार, पंकज प्रकाश पाटिल, प्रदिप महाले, दिनेश कोळी आदींनी केली आहे. 

सद्या तरुण वर्गा मध्ये अलिकडच्या काळात बुलेट या वाहनांची  मोठया प्रमाणात क्रेझ निर्माण झाली आहे. तरुणांना रस्त्यावरून फटाक्यासारखा फट फट असा आवाज काढणाऱ्या बुलेट बाबत खूपच आकर्षण आहे. त्यामुळे बुलेट खरेदी करून आणल्या नंतर अनेक जण वेगळा खर्च करून  बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करतात. परंतु असा विचीत्र कर्कशा व जिवघेणा आवाज काढणे कायदेशीर गुन्हा आहे. या आवाजा मुळे ध्वनिप्रदूषण आणि कायद्याचे उल्लंघन होते. तसेच, गर्दीच्या रस्त्यावर बुलेटचा मोठा आवाज आल्यामुळे दुसरा वाहनचालक अचानक दचकून त्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे. वाहने चालविताना बुलेटच्या आवाजाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी काही वाहन चालकांनी वरणगाव पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या आहेत. त्या अनुशंगाने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांनी कारवाया देखील केलेल्या आहेत परंतु या बुलेटचालकांची सद्या मुजोरगीरी वाढत असल्याने त्याचा मात्र खुप त्रास वाढला असुन कोरोना आजारां मधुन नुकतेच बरे झालेल्या रुंग्णाना मोठया प्रमाणात होत आहे .त्यामुळे सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या बुलेट वाहन चालकांच्या वाहनांवर कठोर कारवाई वरणगाव पोलिसांनी केल्यावरच हे सत्र थांबू शकेल.

 

 

Protected Content