चेतना व्यसनमुक्ती केंद्र व रोटरी क्लबतर्फे व्यसनमुक्ती दिंडीचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील चेतना व्यसनमुक्ती केंद्र आणि रोटरी क्लब  यांच्या संयुक्त विदयमानाने व्यसनमुक्तीच्या दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. आज जगामध्ये प्रत्येक सेकंदाला 8 लोकांचा मृत्यू हा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रमध्ये प्रत्येक वर्षी 9 लाख लोक हे तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यामुळे मृत्यूमुखी पडतात. हे थाबले पाहिजे. दिंडीमुळे सांघीक भावना निर्माण होते व कार्याची पुर्तता झालेली दिसुन येते आपला जळगाव जिल्हा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनापासून दूर राहिले पाहिजे, हया उद्देशातून सदरील दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. हि दिंडीची सुरवात सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळया पासून सुरु होणार असून, समाप्ती राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ होणार आहे.

 

सदरील लोकजागर कार्यक्रमात सर्व जळगावकरांनी या कार्याक्रमात सहभागी होवून व्यसन मुक्तीचा जागर प्रत्येकाच्या मनामनात करु या,  असे आवाहन  चेतन व्यसन मुक्तीचे संचालक नितीन विसपुते आणि रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष संदीप शर्मा यांनी केलेले आहे.

Protected Content