शिवजयंतीला मोटर सायकल रॅलीसह कार्यक्रमांना परवानगी द्या – शिव प्रतिष्ठानची मागणी

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शनिवार दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून या दिवशी शिवभक्तांना मोटर सायकल रॅली व कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी जामनेर शिव प्रतिष्ठान तर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सालाबादाप्रमाणे जामनेर शहरांमध्ये शिवप्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिवजयंती साजरी करताना सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमी राहुल चव्हाण व सचिन बोरसे या दोघांना प्रशासनाच्या वतीने हद्दपारीची नोटीस काढण्यात आली आहे ती रद्द करण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले. पोलिस प्रशासनाने शिवभक्तांना शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली काढण्यास परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतांना अॅड. भरत पवार, अतुल सोनवणे, सुरेश चव्हाण, महेंद्र बिराडे, विशाल वानखेडे, खुशाल पवार, शे. अहमद शेख रज्जाक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

Protected Content