कंजरवाडा येथील ट्रान्सफॉर्मरला अचानक आग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरांतील कंजरवाडा येथील एका वीज ट्रान्सफार्मरला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कंजरवाडा येथील वीजेच्या ट्रान्सफार्मरला सोमवारी ३० मे रोजी दुपारी ४ वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. ट्रान्सफार्मरमधून आईल निघत असतांना अचानक आग लागली. थोड्याच वेळाने आगीने रौद्र्य रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे राहूल नेतलेकर यांनी तात्काळ उपमहापौर कुलभूषण पाटील यांना माहिती दिली. त्यानुसार उपमहापौर कुलभूषण पाटील तात्काळ अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. अवघ्या काही मिनिटात अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काही मिनीटात ही आग आटोक्यात आणण्यात आली. जिल्हापेठ पावर हाऊस कक्षाचे अभियंता जयेश तिवारी, कर्मचारी महेश कळस्कर, लोंढे, नमो यांनी देखील घटनास्थळी दाखल झाले.  यावेळी परिसरातील नागरीक  कंजरभाट समाजाचे  नितीन तमायचे, योगेश बागडे, विजय बागडे, शशिकांत बागडे, विवेक नेतलेकर, निखिल गारुगे, कपिल बागडे, राहुल तमायचे यांनी उपस्थित होते. तर आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे कर्मचारी वाहन चालक-निवांत इंगळे,युसुफ पटेल,संतोष पाटील, मोहन भाकरे यांनी सहकार्य केले

Protected Content