दाऊद इब्राहीम पाकमध्येच ! ; पहिल्यांदाच जाहीर कबुली

इस्लामाबाद । १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्येच लपून बसला असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने प्रथमच दिली आहे.

पाकिस्तान दहशतवाद पोसत असल्याचे सातत्याने समोर येऊ लागल्याने एफएटीएफचे निर्बंध टाळण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे. दरम्यान, १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्येच लपून बसला असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने प्रथमच दिली आहे.

दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी देखरेख ठेवून असणार्‍या एफएटीएफ या संस्थेच्या कारवाईची टांगती तलवार पाकिस्तावर आहे. त्यामुळे या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटना आणि हाफिझ सईद, मसूद अझहर आमि दाऊद इब्राहिमसह अन्य काही बड्या दहशतवाद्यांवर कारवाईचा बडगा उगारत कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. तसेच पाकिस्तान गेली अनेक वर्षे दाऊद इब्राहिम हा आपल्याकडे असल्याची बाब सातत्याने नाकारत होता. मात्र आज पहिल्यांदाच पाकिस्तानने दाऊद हा आपल्या देशात लपून बसला असल्याचे खुलेपणाने मान्य केले आहे.

पाकिस्तानने ही कारवाई एफएटीएफच्या ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी केल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटना व अनेक कुख्यात दहशतवाद्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आणि त्यांची बँक खाती सील करण्याचे आदेश जारी केले आहेत. यानंतर पाकने आपल्या देशातच दाऊद इब्राहीम असल्याचे सांगितले आहे.

Protected Content