महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर ‘लॉकशाही’ : फडणविसांची खोचक टीका

 

पंढरपूर । राज्य सरकार कोरोनाच्या प्रतिकारात सपशेल चुकले असून महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर ‘लॉकशाही’ असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज पंढरपुरातील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मंगळवेढा येथे आयोजित सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिलेला नाही.आम्ही नेहमी म्हणायचो की, महाराष्ट्रात लोकशाही आहे; पण आता लोकशाहीऐवजी लॉकशाही सुरु आहे. (लॉकडाऊन) कधी लॉक करायचं…कधी अनलॉक करायचं…ठीक आहे तेदेखील आवश्यक असतं. परंतु, जेव्हा अशाप्रकारे लॉकडाऊन होतो, तेव्हा लोकांचा रोजगार जातो. तेव्हा किमान त्या लोकांना दिलासा म्हणून आपल्या तिजोरीतून २ रुपये दिले पाहिजेत. पण, सरकारला कुठेही भान दिसत नाही, अशी टीकाही त्‍यांनी केली.

Protected Content