काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे !

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज झालेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा निर्णय जाहीर केला.

 

गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राजधानी दिल्लीतील दंगलीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला होता. तसेच, गेल्या लोकसभा अध्यक्षांकडून पत्र काढून घेतल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या या सात खासदारांचे निलंबन केले होते. यामध्ये खासदार गौरव गोगोई, टीएन प्रथापन, डीन कुरियाकोसे, आर. उन्निथन, माणिकम टागोर, बेनी बेहनन आणि गुरजितसिंग औजला यांचा समावेश होता. परंतू आज झालेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत या सात खासदारांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला

Protected Content