ज्योतिरादित्य शिंदे आज करणार भाजपात प्रवेश !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते आजच भाजपात प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्ली पक्ष मुख्यालयात हा प्रवेश सोहळा होणार आहे.

 

ज्योतिरादित्य यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ज्योतिरादित्य यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचे कॉंग्रेसने म्हटले होते. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सहा मंत्र्यांसह एकूण २२ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हे सर्व आमदार सध्या बंगळूरमधील एका हॉटेलमध्ये आहेत. तर दुसरीकडे ज्योतिरादित्य यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Protected Content