भुसावळातील वांजोळा फाट्याजवळ बोगद्यासाठी प्रांतांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा फाट्याजवळ बोगदा तयार करण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशी यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्‍य न झाल्यास उपोषण व रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६ जवळ असलेल्या वांजाळा फाटा येथे एक बोगदा तयार करण्यात यावा. कारण शेतकरी, शेतमजूरी, राधास्वामी सत्संग, कला नगर, प्रेरणा नगर, महेश नगर, राजस्थान मार्बल मागील भाग, रेणूका देवी मंदीर परीसर तसेच वांजोळा गाव रहिवाश्यांना भुसावळ शहरात ये-जा करण्यासाठी बोगदा नसल्याने दोन किलोमीटर अंतराचा फेरा पडत असल्याने नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच शैक्षणिक विद्यार्थ्यांना परवाडणारे नसल्याने त्यांना मोठा मानस्ताप सहन करावा लागत आहे. नागरीक आणि विद्यार्थ्यांची अडचण दुर करण्यासाठी वांजोळा फाटा येथे बोगदा तयार करून मिळावा, रहिवाशांची मागणी मान्य न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण किंवा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रमोद पाटील, भिमा बोरसे, अशोक पाटील, आबा शिरसाट, रमेश नेमाडे, पुनमचंद चंदनसागर, नितीन वाघ, पंडीत काकडे, उल्हास महाजन, भागवत पाटील, भावना चौधरी, मधुकार चौधरी, विलास पाचपांडे, ज्ञानदेव कोल्हे, सजन फालक, किशोर शदपूर, नितीन उगले, तुळशीराम देवेशी, केतन दामले, भुषण काटकर, दिपक कोळी, योगेश कळसकर, मिना सोनवणे, सुधीर ढाके, मयुर पाटील आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content