बिग ब्रेकींग : देशातील या राज्यातील विधानसभेच्या निवडणूका जाहीर;

केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषणा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोग यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेवून देशातील पाच राज्यातील (Assembly Election 2023 Dates) विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगाणा या पाच राज्याचा समावेश राहणार आहे. दरम्यान (Assembly Election 2023 Dates) मध्यप्रदेशात १७ नोव्हेंबर, छत्तीसगड येथे ७ आणि १६ नोव्हेबर, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर, मिझोरममध्ये ७ नोव्हेबर तर तेलंगाणा येथे ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर पाचही राज्यांची मतमोजणी (Election Result) ३ डिसेंबर रोजी होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

पाच राज्यात १६ कोटीपेक्षा अधिक मतदार आहे. पाच राज्यात ६७९ जागांवर मतदान होणार आहे. ६० लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात  आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता  लागू करण्यात येणार आहे.   मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये २ कोटी ३ हजार, मध्य प्रदेशमध्ये ५ कोटी ६ लाख , राजस्थानमध्ये ५ कोटी २५ लाख  कोटी आणि तेलंगणामध्ये ३ कोटी १७ लाख कोटी मतदार मतदान करणार आहेत.

१७ ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार

पाच राज्यांमध्ये ८ कोटी २ लाख पुरुष मतदार आहेत. १७ ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार असून, २३ ऑक्टोबरपर्यंत मतदान यादी सुधारण्याची संधी मतदारांना असणार आहे.  १७ हजार ७३४ मॉडेल मतदान केंद्रे आणि ६२१ मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. दरम्यान केंद्री निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय खलबते सुरू झाले आहे.

Protected Content