लोखंडी सळई व विटाने मारहाण केल्याने बाप-लेक जखमी

वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांधकामाचे कॉलम हद्दीत टाकण्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून बाप लेकाला शिवीगाळ व धमकी देवून लोखंडी सळई आणि विटा मारून दुखापत केल्याची घटना रविवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भुसावळ तालुक्यातील सुसरी येथे घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तमराव काशिनाथ इंगळे (वय-५१) रा. सुसरी ता. भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावात त्यांच्या मालकीच्या जागेत शेजारी राहणारे अरूणा गणेश इंगळे यांनी बांधकामचे कॉलम टाकण्याचे काम सुरू केले. रविवार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उत्तमराव इंगळे यांनी आमच्या जागेत कॉलम का बांधत आहे असा जाब विचारला. याचा राग आल्याने अरूणा गणेश इंगळे, पंकज गणेश  इंगळे, सारीका गणेश इंगळे, अंजली पंकज इंगळे चौघे रा. सुसरी ता.भुसावळ, सुरेखा प्रेमचंद केदारे, प्रेमचंद पुंडलिक केदारे, आर्यन प्रेमचंद केदारे तिघे रा. बामणोद ता.यावल, अशोक तुकाराम तायडे रा.मानपूर ता.भुसावळ व इतर अनोळखी चार जणांनी उत्तमराव इंगळे व त्यांचा मुलगा संघर्ष इंगळे यांना लोखंडी सळई आणि विटा मारून गंभीर दुखापत केली. तसेच तुझे घर पाडून त्या जागेवर बांधकाम करेल अशी धमकी दिली. या घटनेनंतर उत्तमराव इंगळे यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोहर पाटील करीत आहे.

Protected Content