धनाजी नाना महाविद्यालयात दीपोत्सवानिमित्त फराळ वाटप

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात या वर्षी दीपोत्सव महापर्वाच्या सुरुवातीला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधूंना प्राचार्य डॉ पी आर चौधरी व प्रा सौ सुनीता चौधरी यांच्या परिवाराच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले.

यासोबत सर्वांनी एकत्र येऊन दीपावली फराळाचा आस्वाद घेतला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर. चौधरी यांनी सांगितले की, महाविद्यालयातील सकारात्मक वातावरणास, सहकार्यास आणि पुढील वाटचालीस या दिपोत्सव मनोमिलनाचा फायदा होईल. यासोबत सकारात्मक शैक्षणिक वातावरण तयार होण्यास मदत होईल.

Protected Content