धाबे येथे पर्यावरणपूरक शैक्षणिक दिवाळी साजरी

dhabe gaon diwali

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील धाबे येथील शाळेत या वर्षीदेखील पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यात येऊन विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

धाबे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी आपल्या परिवारासह विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप केले. हे या उपक्रमाचे आठवे वर्ष असुन दरवर्षी विदयार्थ्यांना व गावकरींना पर्यावरणपूरक फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देवुन हा उपक्रम राबविला जातो. धाबे हे आदिवासी भिल्ल समाजबहुल आहे. मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे हे आठ वर्षापूर्वी धाबे शाळेवर हजर झाल्यापासुन त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. यात अगोदर शाळा व परिसराची गावातील युवकाच्या सहकार्याने स्वच्छता व साफ सफाई करण्यात आली. लक्ष्मीपूजन म्हणुन झाडु व खरे धन बालकांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक साळुंखे यांच्या पत्नी सौ. चित्रा पाटील, गुणवंतराव पाटील यांच्या पत्नी सौ वैशाली पाटील, सौ वैशाली शिंपी, सौ पूनम क्षत्रिय यांनी स्वहस्ते बनविलेला घरगुती फराळ व मिठाई वाटप केली. तसेच विदयार्थ्यांना हिवाळी सुटीत तणावमुक्त स्वईच्छेने राष्ट्रपुरुषांच्या माहितीचे लेखन करण्याचा गृहपाठ पुर्ण करण्यासाठी वह्या व पेन शिक्षकांकडुन वाटप करण्यात आले. यावेळी बालकांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडुन वाहत होता. यावेळी अनिल शिंपी, मयुर शिंपी, गणेश क्षत्रिय, रोहित माळी, गणेश पाटील , रविंद्र वाघ, सिद्धराज साळुंखे यांचे सहकार्य लाभले.

Protected Content