भुसावळ नाहाटा महाविद्यालयात “उमंग-मॅनेजमेंट डेस सेलिब्रेशन” उत्साहात

bhusawal 2

भुसावळ प्रतिनिधी । येथील कला, विज्ञान आणि कॉमर्स महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील बी.बी. ए. व बी.एम.एस. (ई-कॉमर्स) च्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय “उमंग – मॅनेजमेंट डेस सेलिब्रेशन” या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  मा.डॉ. मोहनभाऊ फालक ,ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.महेशभाऊ फालक,ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा.विष्णुभाऊ चौधरी, कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी डॉ. सुमित्रा चव्हाण, उपप्राचार्य डॉ. बी .एच. बऱ्हाटे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.व्ही. जि. कोचुरे, उमंग समन्वयक डॉ. रश्मी शर्मा,उमंग इंचार्ज प्रा.स्मिता एन. बेंडाळे इ. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.महेशभाऊ फालक यांना “लेवा समाज भूषण पुरस्कार ” मिळाल्याबद्दल वाणिज्य व व्यवस्थापन विभागामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.उदघाटनात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. मोहनभाऊ फालक यांनी उमंग च्या नियोजनासाठी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी डॉ. सुमित्रा चव्हाण यांनी संज्ञापन कौशल्याचे महत्त्व ,व्यवस्थापन कौशल्याची आजच्या स्पर्धात्मक युगात गरज या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  केले. कार्यक्रमात उपस्थित असलेले उपप्राचार्य डॉ. बी .एच. बऱ्हाटे सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रश्मी शर्मा यांनी केले व आभार प्रर्दशन प्रा. स्मिता एन. बेंडाळे यांनी केले.

उमंग या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि. ११-०२-२०२० रोजी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन,QUIZ कॉम्पिटीशन व  एच .आर गेम्स इ.स्पर्धा घेण्यात आल्या.पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन या स्पर्धेचे परीक्षण उद्योगपति मा. श्री. राजीव शर्मा यांनी केले.दि. १२-०२-२०२० रोजी गीतगायन, नृत्य व फॅशन शो या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. गीतगायन या स्पर्धेचे परीक्षण प्रा. राजश्री देशमुख यांनी केले. नृत्यकलेचे परीक्षण मा.दिनेश बोरीकर यांनी केले तर फॅशन शो चे परीक्षण सौ.कमल सचदेव व सौ.नूतन फालक यांनी केले. तसेच बी .बी ए  व बी .एम.एस (ई-कॉमर्स) च्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन व विक्री कौशल्य विकसित करावे या उद्दिष्टाने फूड स्टॉल चे देखील आयोजन केले. या कार्यक्रमातील विविध स्पेर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून स्पर्धेत भाग घेतले व आनंद लुटला. या राज्यस्तरीय उमंग कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे :
* पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन : प्रथम – निलेश अलोने, द्वितीय – महेश सोळुंके, तृतीय – सादिया काझी  आणि रानी चौधरी
* QUIZ कॉम्पिटीशन: प्रथम – निकिता बिसेन व सादिया हुसेन,द्वितीय –  महेश सोळुंके व धनंजय सोनी, तृतीय – सुरज धांडे व प्रतीक्षा वाघ
* गीतगायन :   प्रथम – नेहा जैस्वाल  , द्वितीय – धम्मांगिनी सपकाळे, तृतीय –  वैभवी चौधरी
* नृत्यकला : समूह नृत्य : प्रथम – आर्मी ग्रुप  , द्वितीय – कपिल अँड आरती ग्रुप
* एकलनृत्य : प्रथम – नितीन पवार , द्वितीय – मयूर तायडे, तृतीय – साधना प्रजापत
* फॅशन शो : उमंग किंग – फरीज   खान , उमंग क्वीन – मनीषा गुरुबक्षणी द्वितीय :सॅड्रीक वॅलेंटिन , द्वितीय – ट्वीनकल झोपे

या कार्यक्रमात शिस्त व नोंदणी समिती प्रा. प्रियांका वारके, पी.पी.टी. समिती प्रा.वर्ष पाटील, स्टॉल व गीतगायन स्पर्धा समिती प्रा.भूषण चौधरी, प्रश्न मंजुषा समिती प्रा.सपना कोल्हे, फॅशन शो समिती प्रा.स्वाती शेळके, भोजन व नृत्य समिती प्रा.खिलेश पाटील, वृत्तपत्र समिती प्रा.डॉ.ममता पाटील म्हणून काम पहिले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे मॅम आणि उपप्राचार्य डॉ.एन.ई. भंगाळे यांचे अनमोल मार्गमार्गदर्शन लाभले. कार्यक्रमच्या यस्वीतेसाठी प्रा.डॉ. पी.के.पाटील, प्रा.के.पी.पाटील, प्रा.हेमंत सावकारे, प्रा.जयश्री चौधरी, बापू वारके यांचेदेखील सहकार्य लाभले

Protected Content