
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपास येथील वळणावर कारमधून निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर धरणगाव पोलीसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई रविवारी १२ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता केली. पोलीसांना पाहून चालक कार जागेवर सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील बायपास राष्ट्रीय महामार्गावरून अवैधपणे कारमध्ये कोंबून गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी रविवारी १२ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता कारवाई केली. यावेळी कारवरील चालकाने वाहन जागेवर सोडून पसार झाला आहे. पोलीसांनी एक गाय, एक गोऱ्हा, दोन म्हशीचे पारडू आणि वाहन क्रमांक (एमएच ०४ ईझेड ७००१) असे एकुण २ लाख १८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पवार हे करीत आहे.



