चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी उसळली गर्दी

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोना प्रतिबंधित लसीचे तुटवडा गेल्या काही दिवसांपासून होत असल्याने मध्यंतरी लसीकरणात खंड पडला होता. मात्र गुरूवार रोजी कोव्हिशिल्ड लसीचे ५५०० डोस चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाल अर्थात कोव्हीड सेंटरला प्राप्त झाल्याने प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात करण्यात आले असून ट्रामा केअर सेंटर येथे दुपारपर्यंत ३०० जणांचे लसीकरण करण्यात आले.

 

गेल्या काही दिवसांपासून कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सीन ह्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. ४५ वयोगटावरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लसीचा तुटवडा जाणवत असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. परंतु गुरूवार, ६ मे रोजी चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला कोव्हिशिल्डचे ५५०० डोस प्राप्त झाले आहे. शुक्रवारपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. हे डोस ग्रामीण रूग्णालयासह अन्य रूग्णालयाला वितरीत करण्यात आले आहे. ११०० डोसेस हे चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात तर उर्वरित इतर प्राथमिक आरोग्य केंद्राला वितरीत करण्यात आले आहे.

 

दहिवद, खेडगाव, लोंढे पातोंडा, रांजणगाव, शिरसगाव, तळेगाव, तरवाडे, उंबरखेड, मेहूणबारा ग्रामीण रूग्णालय, वागळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह १२ केंद्रावर ४५ वयोगटावरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणात दुसऱ्यांदा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण हे ७० टक्के तर पहिल्यांदा डोस घेणार्यांचे  प्रमाण हे ३० टक्के आहे. शुक्रवार ७ मे पासून लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे माहिती वृत्त माध्यमातून सर्वांना कळताच येथील ट्रामा केअर सेंटरला सकाळपासून एकच गर्दी पहायला मिळाली. यावेळी मीच लस घेणार हि चढाओढ अनेकांमध्ये एक चुरस बनलेली होती. शंभर जणांचे लसीकरण करण्याचे लक्ष असताना दुपारपर्यंत चक्क ३०० जणांचे लसीकरण करण्यात आले. हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या प्राप्त झालेली लस ही ४५ वयोगटावरील नागरिकांनाच असून सर्वांचे लसीकरण करण्यात येईल त्यामुळे विनाकारण गर्दी करू नका असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी केले आहे.

Protected Content