बांबू लागवडीची कास धरा : पाशा पटेल

चाळीसगाव प्रतिनिधी | पर्यावरण संवर्धनाला मदत आणि स्वत:ची आर्थिक उन्नती असा दुहेरी हेतू साधण्यासाठी शेतकर्‍यांनी बांबू लागवडीची कास धरावी असे आवाहन राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष बांबू मिशन राबवणारे पाशा पटेल यांनी केले. ते येथील बांबू लागवड कार्यशाळेत बोलत होते.

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या पुढाकाराने साकारणार्‍या महाराष्ट्र राज्य शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फेडरेशन आयोजित तसेच जिल्ह्यातील आत्मा शेतकरी गटाच्या सन्माननीय सदस्यांच्या उपस्थित तसेच नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान या सेवा कार्यकाळास २० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आज चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय उत्तमराव पाटील वनोद्यानाच्या मनमोहक परिसरात सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत पाच तास ही कार्यशाळा चालली. या कार्यशाळा जिल्हाभरातून बांबू लागवडीसाठी उत्सुक असलेल्या शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. उत्तमराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाशा पटेल बोलताना पुढे म्हणाले की बांबू लागवड ही परदेशात होत नसली तरी बांबूवर संशोधन करण्याची त्या देशांची प्रवृत्तीही बांबूचे उपयुक्तता व बांबूचे पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत आहे माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की परंपरागत शेती करत असताना बांबू लागवड याची कास धरून आपल्या आर्थिक प्रगती साधावी. यावेळी कोकण बांबू विकास केंद्र तथा कोणबॅक संचालक संजय करपे यांनी जागतिक पातळीवर बांबूला महत्व प्राप्त झाले असून आपण बांबूवर १८ देशांमध्ये काम करीत असून चिनपेक्षा भारतीय तंत्रज्ञान सरस ठरत असल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी चलचित्रफितीद्वारे शेतकर्‍यांना बांबू लागवड,जातीची निवड, जागतिक स्तरावर भारतीय बांबूचे महत्व ,उपयोग व उत्पादन तसेच बांबूपासून तयार होणार्‍या १८ वस्तूची माहिती देऊन बांबूचे माणसाच्या जीवनातील महत्त्व पटवून दिले.

खासदार उन्मेशदादा पाटील हे केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटण्यासाठी दिल्लीत असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या अध्यक्षा संपदाताई पाटील यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाला कोकण बांबु विकास केंद्र अर्थात कोणबॅक संचालक संजय करपे, के. बी. साळुंखे (सेवा आणि समर्पण अभियान जळगाव लोकसभा प्रमुख) डॉ. हेमंत बाहेती (कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद जळगाव); सागर धनाड (जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना); अमोल मोरे (तहसीलदार चाळीसगाव) , पोकरा योजनेचे तंत्र अधिकारी संजय पवार, आत्मा चे कुर्बान तडवी, लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता विश्वासराव चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार सरपंच संघटनेचे नेते किसनराव जोर्वेकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम; ,मंगलाताई भाऊसाहेब जाधव (माजी सभापती तथा जीप सदस्या) मोहिनी अनिल गायकवाड(जि प.सदस्या); तालुका कृषी अधिकारी सी.डी.साठे; गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, वन परिक्षेत्र अधिकारी (सामाजिक वनीकरण ) आर एस दसरे, वनपरीक्षेत्र अधिकारी (वन्यजीव); ज्ञानेश्वर देसाई , पंचायत समितीचे उपसभापती सुनील साहेबराव पाटील, माजी सभापती पंचायत समिती स्मितल दिनेश बोरसे पंचायत समितीचे सदस्य संजय भास्करराव पाटील, पालिका गटनेते संजय पाटील, किसान मोर्चाचे सुरेश महाराज, ग्रामसेवक संघटनेचे प्रदेश नेते संजीव निकम, ऍड.प्रकाश पाटील पढावदकर, चंद्रकांत सोनवणे चोपडा, भाजपा तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, तालुका सचिव गिरीश बर्‍हाटे, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र चौधरी, उमंग अध्यक्षा साधना पाटील, सर्पमित्र राजेश ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते उदय पवार, आत्मा व्यवस्थापन ज्ञानेश्वर पवार, अमित पाटील. आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजप तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.संपदाताई पाटील यांनी आजच्या जिल्हास्तरीय बांबु लागवड कार्यशाळामागची खासदार उन्मेशदादा पाटील यांची भूमिका विशद करत बांबू लागवड ही काळाची गरज असून शेतकरी समृद्धीचा नवा पर्याय म्हणून उपस्थित शेतकरी बंधूंनी बांबू लागवडीबाबत या कार्यशाळेतून प्रेरणा घ्यावी. असे आवाहन केले.

सेवा व समर्पण अभियान लोकसभा प्रमुख के.बी. साळुंखे यांनी खासदार उन्मेश दादा पाटील आमदार आणि खासदार कार्यकाळात सूरु असलेल्या विकास कामाचा आढावा सादर केला. स्व. उत्तमराव पाटील उद्यानाच्या बाबत उपस्थितांना माहिती देत सेवा व समर्पण अभियानास मदत करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आभार मानले. यावेळी जिल्हा समन्वयक सागर धनाड, फेडरेशन संचालक भूपेंद्र महाले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार माजी पंस सदस्य दिनेश बोरसे यांनी तर सूत्रसंचालन अर्जुन परदेशी यांनी केले.

कार्यक्रमाला जिल्हाभरातून शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात उपस्थिती देऊन कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीचे चाळीसगाव तालुक्यातील विविध आघाडी युवा मोर्चा पदाधिकारी ,आजी माजी सरपंच, विविध विकास सोसायट्यांचे चेअरमन पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख व कार्यकर्ते तसेच आत्मा गटाचे प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content