पिंपरखेड परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

bibtya halla

चाळीसगाव प्रतिनिधी । गौताळा अभयारण्य परिसरातून जवळच असेलेल्या तालुक्यातील पिंपरखेड गावात घसून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.

तालुक्यातील पिंपरखेड गावात गेली अनेक दिवस शेतकऱ्यांची गुरे बिबट्या फस्त करीत होता. पिंपरखेड येथील शेतकरी ज्ञानेश्वर मुलमुले यांच्या शेतातील जवळपास सात ते आठ बकऱ्या, गाई-वासरे या बिबट्याने फस्त केले आहेत, त्याने परिसर दहशतीखाली होता. शेतकरी शेतात जात नव्हती शेतीकामासाठी मजूरही येत नव्हते म्हणून शेतकऱ्यांनी 24 सप्टेंबर रोजी चाळीसगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात मोठ्या जमावनिशी येऊन रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री पवार यांच्याकडे तक्रारी करून पिंजरा मिळण्यासाठी ठिय्या मारला होता. त्यांच्या तक्रारीवरून वनविभागाने पिंजरा लावला असता आज सकाळी त्यात बिबट्या अडकला त्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Protected Content