भारत-श्रीलंका टी-२० मालिका जानेवारीपासून सुरु

teem

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारत आणि श्रीलंकेदरम्यान येत्या जानेवारी महिन्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. या दोघ संघामध्ये ५ जानेवारी रोजी मालिकेतील पहिला सामना लढत गुवाहाटी येथे होणार आहे. अशी घोषणा बीसीसीआयने नुकतीच केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट संघाला निलंबित केल्यानंतर बीसीसीआयने श्रीलंकेला टी-२० मालिकेसाठी निमंत्रण धाडले होते. हे निमंत्रण श्रीलंकेने स्वीकारले आहे. मालिकेतील पहिला सामना येत्या ५ जानेवारी रोजी गुवाहाटी येथे, दुसरा सामना ७ जानेवारी रोजी इंदूरमध्ये तर अखेरचा सामना १० जानेवारी रोजी पुण्यात खेळवला जाणार आहे. नुकतीच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका पार पडली. ही मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. आता या दोन्ही संघांदरम्यान २ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिली कसोटी विशाखापट्टणम येथे रंगणार आहे.

Protected Content