मारुती कार होणार आता पाच हजारांनी स्वस्त

MarutiSuzuki

मुंबई प्रतिनिधी । देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमतींमध्ये पाच हजार रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) कपात केली आहे. केंद्र सरकारने कंपनी करात केलेल्या कपातीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून नवीन दर २५ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इतर कंपन्यांसह मारुती सुझुकीच्या कार विक्रीमध्ये १० महिन्यांपासून घट होत आहे. या पार्श्वभूमीवर काही श्रेणीतील कारची किंमत घटवण्यात येईल असे संकेत कंपनीचे अध्यक्ष आर.सी.भार्गव यांनी नुकतेच दिले होते. त्यानुसार ‘मारुती’कडून बुधवारी ही घोषणा करण्यात आली. यानुसार अल्टो ८००, अल्टो के १०, स्विफ्ट डिझेल, सेलेरिओ, बलेनो डिझेल, इग्निस, डिझायर डिझेल, वितारा ब्रेझा, टूर एस डिझेल आणि एस क्रॉस या कारची किंमत पाच हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. पूर्ण देशभरासाठी या सुधारित किमती लागू असतील, तसेच सध्या उपलब्ध असणाऱ्या ऑफरव्यतिरिक्त ही कपात असेल, असे या कंपनीने म्हटले आहे. ग्राहक या कपातीचा लाभ घेतील व एकूण कारविक्रीत वाढ होईल, अशी आशा या कंपनीने व्यक्त केली आहे.

Protected Content