रावेर बाजार समितीवर लवकरच नऊ प्रशासकाचे मंडळ !

रावेर प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपणार असल्यामुळे येथे आ. शिरीष चौधरी यांच्या पुढाकाराने नऊ प्रशासकांच्या मंडळाची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रत्येकी तीन सदस्यांचा समावेश असेल अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला मिळालेली मुदत येत्या २३ तारखेला संपत असून आमदार शिरीष चौधरी यांनी लक्ष घालुन भाजपा सोडुन राष्ट्रवादी,शिवसेना व कॉग्रेसपक्षाच्या प्रत्येकी तिन असे एकूण नऊ संचालकांना प्रशासक मंडळ म्हणून नियुक्ती देण्याची शिफारस पालकमंत्र्याकडे केली आहे. त्यामुळे विद्यमान सभापती गोपाळ नेमाडेसह भाजपा संचालकांचा येथून पत्ताकट होणार आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार अरुण पाटील यांच्या पुढाकारामुळे रावेर कृषी उपन्न बाजार समितीत २०१६ मध्ये सर्वपक्षीय पॅनल निवडुन आले होते. त्यानंतर सर्व संचालक मंडळाने आपसात ठरवुन भाजपा कॉग्रेस व राष्ट्रवादीने येथे सभापती उपसभापती पदे भूषवली. यानंतर भाजपाला दे-धक्का देत आमदार शिरीष चौधरी यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातुन राष्ट्रवादी शिवसेना व कॉग्रेस पक्षाचे प्रत्येकी तिन नावे प्रशासक मंडळकासाठी निश्चित केले असून शासनाकडे शिफारस केली आहे.त्यामुळे सभापती गोपाळ नेमाडेंसह भाजपाच्या सदस्यांचा येथून पत्ता कट होणार आहे.केळी भावाचा गुंता-गुंती जटील प्रश्न विद्यमान संचालकांना सोडविता आला नाही

आघाडीच्या फॉर्म्युला नुसार शिफारस : आ चौधरी

रावेर कृषी उपन्न बाजार समितीला महाविकास आघाडीच्या फॉर्म्युला नुसार प्रशासक मंडळ नियुक्ती देण्याचे आम्ही ठरविले आहे.यासाठी आम्ही कॉग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी तिन्ही पक्षाच्या पत्येकी तीन असे एकूण नऊ संचालकांचे प्रशासक मंडळ देण्याचे ठरविले आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.

लवकरच बाजार समितीची रणधुमाळी

दरम्यान, रावेर बाजार समितीची पंचवर्षीक निवडणुकीची रणधुमाळी येत्या तिन महीन्यात केव्हाही होणार आहे.बाजार समितीने पाच वर्षात सात सभापती बघितले.यापैकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष निळकंठ चौधरींचा कार्यकाळ चर्चेत राहीला मागील दहा वर्षात सर्वाधिक ४१ लाखाचा वाढावा त्यांनी बाजार समितीला मिळवुन दिला तसेच टन काटे,शॉपिंग कॉम्पलेस, लेआऊट,शेतकर्‍यांचे व्यापारी संदर्भात तक्रारी सोडविण्यात श्री चौधरी अग्रेसर राहीले.

Protected Content