सचिन तेंडुलकर लवकरच बायोपिकमध्ये दिसणार

Sachin Tendulkar

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर लवकरच एका क्रिकेटपटूच्या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे.

याबाबत माहिती अशी की, मास्टर ब्लास्टर तेंडुलकर आणि श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन हे मैदानावर कट्टर प्रतिद्वंद्वी होते आणि मुथय्याच्या बयोपिकमध्ये आता तेंडुलकर दिसणार आहे. मुरलीधरच्या जिवनावर ‘800’ हा चित्रपट लवकरच येणार आहे आणि त्यात तेंडुलकरही दिसणार असल्याची घोषणा DAR मोशन पिक्चर्स प्रोडक्शन हेड सेतुमाघवन यांनी केली. त्यांनी सांगितले की, ”तेंडुलकर हा जगातील सर्वोत्तम फलंदाज होता आणि मुथय्या हा सर्वोत्तम गोलंदाज. या दोघांची क्रिकेट कारकिर्दी सोबतच सुरू होती. त्यामुळे या चित्रपटात तेंडुलकर असणार आहे.” तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक साजरा करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. दुसरीकडे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुथय्या अव्वल स्थानी आहे. त्यानं कसोटीत 800 विकेट्स घेतल्या आहेत आणि म्हणून त्याच्या चित्रपटाचे नावही ‘800’ असं ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Protected Content