चोपड़ा येथे वीरशासन जयंती व गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम उत्साहात

88cbb722 9e7b 4d0b 91c6 4f6562d97ac8

चोपडा, प्रतिनिधी | भगवान महावीरांच्या वीर शासन जयंती व गुरु पौर्णिमेनिमित्त शहरातील चारही जैन संप्रदायांच्या सकल जैन महिला मंडल ह्या संघटनेने सामाजिक व धार्मिक क्षेत्रात एक नवीन कीर्तिमान पाउल ठेवून समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

 

भगवान महावीरांची वाणी केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर जगातील सर्व प्राणिमात्रला आपले आत्मकल्याण करण्यासाठी जो मार्ग आहे, त्याचे प्रतिपादन ज्या दिवशी देण्याचे सुरु केले, त्या दिवसाला वीर शासन जयंती म्हणून साजरी केले जाते. तसेच ज्या गुरुंनी आपल्या जीवनाला दिशा दाखवून, जीवनाची दशा बदलवली अश्या महान गुरुंचे ऋण फेडणे कठिनच आहे, परंतु त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी गुरुंना वंदन केले.सदर कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करुन जैन राष्ट्रगानाने झाली.

कार्यक्रमाला महावीर पतसंस्थेच्या चेअरमन सौ. रेखाताई शांतिलाल बोथरा व माजी उपनगराध्यक्ष शांतिलाल बोथरा, गुलाबचन्द जैन, विपिन जैन, छोटुलाल नवनीतलाल ह्या चारही समाजाच्या सदस्यांनी सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.सकल जैन महिला मंडल ह्या संघटनेची ओळख म्हणून आर्किटेक्ट अमन जैन ह्यांनी संघटनेसाठी अर्थपूर्ण तयार केलेल्या “नारी शक्ति ने स्वप्न पूर्ति” लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पर्यावरणाला पूरक असे प्लास्टिक कॅरी बॅग ऐवजी साड़ी बॅग आणि सोबत महिलांसाठी घरी बसून रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या ह्या प्रकल्पाचे उदघाटन केले.
साड़ी बॅग प्रकल्पात सकल जैन महिला मंडलाच्या सदस्या सौ.सपना अभय जैन, सौ.पुष्पा जैन, सौ.गीतांजली जैन, सौ.सपना निलेश जैन, श्रीमती संगीता जैन, व सौ.मीनाक्षी जैन ह्यांनी विना शुल्क साडीच्या बॅग शिवुन प्रकल्प वाढीस हातभार लावला. चारही समाजातुन प्रतिनिधिक स्वरुपात डॉ.सौ. सीमा जैन, दीपप्रिया जैन, सौ.अनिता सुराणा यांनी गुरुंचे महत्व सांगून गुरुंचे गुणगान केले. याप्रसंगी महावीर जन्म कल्याणक कार्यक्रमात सहभागी सदस्य व बाल कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
सकल जैन महिला मंडळच्या सदस्यांनी भगवान महावीरांच्या समवशरणचे आणि चोवीस तीर्थंकरांचे वर्णन करत असलेली शानदार नाटिका सादर करत कार्यक्रमाची सांगता केली.
तिलेश शाह यांनी साउंड सिस्टमचे सहकार्य केले तसेच सर्व समाजातील बंधु भागिनींनी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन अंजली जैन व मीनाक्षी जैन, यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. मीनाक्षी जैन यांनी केले.

Protected Content