वन्य प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी कार्यशाळा घेणार – वनाधिकारी पवार

bibtya

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील अनेर काठावरील गावातील वेळोदे, घोडगाव परिसरात बिबट्याचा वावर दिसत असल्याचे परिसरात बोलले जात आहे. तर काहींना प्रत्यक्षात दिसल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात वन अधिकारी
व्ही.एच.पवार यांच्याशी संपर्क केला तर वन्यजीवापासून संरक्षण कसे केले जाते, यावेळी लवकरच कार्यशाळा व मार्गदर्शन करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

सविस्तर असे की, काही दिवसांपूर्वीच वेळोदे येथे एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने चुकून एखादे बिबट्या आला असेल असा समज गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र मागील आठवडाभरापासून गावकऱ्यांना मादी जातीचा बिबट्या आणि त्यासोबत त्याचे दोन पिलू दिसत असल्याने परिसरात चांगलीच घबराट झाली आहे. आरएफओ पी.बी.पाटील यांच्याशी वेळोदे येथील सरपंच रविंद्र बोरसे संपर्क साधला असता उपाययोजना करतो असे सांगितले. मात्र अजूनही कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेले नाही, असे बोरसे यांनी सांगितले. पावसाळा असल्याने शेतीसाठी फवारणी, निंदणी, कोळपणी करणे असे अनेक प्रकारची कामे शेतकऱ्याचे पडून आहे. या भितीमुळे शेतमजूर मागील आठ ते दहा दिवसांपासून शेती कामासाठी गेलेला नाही आहे. वनाधिकारी लवकरात लवकर उपाययोजना करतील का नाही? की अजून एखादयाचे जीव जाईल तेव्हाच यांना जाग येईल ? असा संप्तत प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. मात्र नुकताच सहा.वनरक्षक व्ही.एच.पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वन्यजीवापासून आपण आपले स्वरक्षण कसे करावे, यासाठी लवकरच कार्यशाळा व मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले असून याचबरोबर काही चित्रफिती दाखविले जाणार आहेत. यासाठी वन्यजीव तज्ञांची टीम जळगावहुन येत आहे. आणि वेळोदे, घोडगाव या दोघ गावात घेणार आहेत, असे ही पवार यांनी सांगितले.

Protected Content